नेहा पेंडसेचा हा जबरदस्त फोटो कुणालाही करेल फिदा, रुपेरी पडद्यावर कमबॅकसाठी नेहा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:16 AM2018-11-03T11:16:51+5:302018-11-03T11:18:11+5:30

सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

NEHA PENDSE LOOKS STUNNING IN NEW AVTAR, READY TO RETURN ON SILVER SCREEN | नेहा पेंडसेचा हा जबरदस्त फोटो कुणालाही करेल फिदा, रुपेरी पडद्यावर कमबॅकसाठी नेहा सज्ज

नेहा पेंडसेचा हा जबरदस्त फोटो कुणालाही करेल फिदा, रुपेरी पडद्यावर कमबॅकसाठी नेहा सज्ज

googlenewsNext

अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मध्यंतरीच्या काळात ती रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये बिझी होती. त्यामुळे आता नेहाच्या फॅन्सना तिने लवकरात लवकर रुपेरी पडद्यावर यावे अशी इच्छा आहे. नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते. नुकतंच नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. 

मी जे काही काय करते ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करते असं कॅप्शनही नेहाने या फोटोला दिलं होतं. तसंच पुन्हा एकदा जुन्या आठवणी, मूड, पुन्हा एकदा कामावर असे हॅशटॅगही तिने या फोटोला दिले. नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षा वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते. वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिच्या या व्हिडीओला बऱ्याच कमेंट्स आणि लाईक्सही मिळाल्या होत्या. तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.  

नेहा गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, चित्रपटांमध्ये काम करत आहे. नेहाच्या घरातील कोणीच चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. पण तरीही तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले आहे. नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. त्यावेळी तिला त्या कामाचे ५०० रुपये मिळाले होते. हे पैसे तिने तिच्या पालकांना दिले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 
 

Web Title: NEHA PENDSE LOOKS STUNNING IN NEW AVTAR, READY TO RETURN ON SILVER SCREEN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.