ठळक मुद्देवैदहीने मुक्ता बर्वेसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बामध्ये वैदही दिसली होती.

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.  रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती.  


वैदहीने मुक्ता बर्वेसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  मुक्ताला वैदही प्रेरणास्थानी मानत असल्याचे तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मुक्ता वेडिंगचा शिनेमामध्ये दिसली होती. यात मुक्ताने उर्वी नावाची भूमिका साकारली होती. मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती घडतंय बिघडतंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली.

अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती.जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. आज मराठीतीत आघाडीची अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे पाहिले जाते.  

 वैदहीबाबत बोलायचे झाले तर तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.  


Web Title: Mukta barve is inspiration of vaidehi parshurami
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.