Mrunmayee Deshpande shared the photo of the saree, looking very nice TJL | मृण्मयी देशपांडेने शेअर केला साडीतील फोटो, दिसतेय झक्कास

मृण्मयी देशपांडेने शेअर केला साडीतील फोटो, दिसतेय झक्कास

कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. लॉकडाउनमध्ये क्वारंटाईन झालेली मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मृण्यमयीने फर्जद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Mrunmayee Deshpande shared the photo of the saree, looking very nice TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.