सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सा-यांना घरातच राहण्याची सरकारने आदेश दिले आहेत. अशात नेहमी बिझी असणारे सेलिब्रेटीही बंदिस्त घरात त्यांच्या घरातील काम करताना दिसत आहे. पहिल्यांदाच अनेक सेलिब्रेटींचे रिअल लूकही जगासमोर आले आहेत. त्यामुळे अनेकांनी सेलिब्रेटी नेहमी मेकअपमध्ये वेगळेच दिसत असल्यामुळे अनेकजण मोठ्या उत्साहाने त्यांचे नोमेकअप लूक पाहत त्यांना भरपूर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षावही करत असल्याचे पाहायला मिळते. 


अभिनेत्री मिथिला पालकरनेसुद्धा तिचा नो मेकअप लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या याफोटोवर आतापर्यंत 2 लाखाहुन अधिक लाईक्स आले आहेत. या फोटोला तिने क्वारांटाईन- बिरनटाईन असे कॅप्शन दिले आहे.  मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे.

मुरांबा या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.

तिने कारवां या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'माझा हनीमून'मध्येही तिच्या अभिनयाचे विशेष कौतूक झाले.  मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

Web Title: Mithila palkar shares her no make up look photo during quarantine period gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.