Mithila Palkar Interesting pictures of the actress you should not miss | मिथीला पालकरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज, या लूकला किती लाईक्स देणार?
मिथीला पालकरचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज, या लूकला किती लाईक्स देणार?


मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.

सिनेइंडस्ट्रीत जोरदार एंट्री केल्यानंतर तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या मिथीलाचा आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आला आहे. ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून मिथीलाने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.

काही महिन्यांपूर्वी मिथीलाच्या सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती. या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता.  तुर्तास मिथीलाचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हा फोटो हॉट आणि ग्लॅमरस असाच म्हणावा लागेल. सोशल मीडियावर मिथीलाचा हा फोटो सध्या सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. 

Web Title: Mithila Palkar Interesting pictures of the actress you should not miss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.