मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन

By तेजल गावडे | Published: June 10, 2021 04:29 PM2021-06-10T16:29:27+5:302021-06-10T16:29:54+5:30

अभिनेत्री मीरा जोशीची हिंदी वेबसीरिज इंदौरी इश्क रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळणार आहे.

Meera Joshi's 'Indouri Ishq' webseries released, bold scene shot on day one | मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन

मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन

Next

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मीरा जोशीची हिंदी वेबसीरिज इंदौरी इश्क आज एमएक्स प्लेअरवर रिलीज झाली आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी केले आहे. या ९ भागांच्या मालिकेत कुणालची प्रेमकहाणी रेखाटण्यात आली आहे. या सीरिजमध्ये मीरा जोशी आलिया नामक २२-२३ वर्षांच्या तरूणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळणार आहे.

मीरा जोशीला इंदौरी इश्क या वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली, याबद्दल विचारले असता ती म्हणाली की, पहिल्या लॉकडाउन दरम्यान तिला रोहन मापुसकर यांचा फोन आला.  त्यांनी या सीरिजबद्दल सांगितले आणि कॅरेक्टर पाठवण्यात आले. त्यात दोन कॅरेक्टर होते. त्यातील एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरूणीचे आणि दुसरे एक बावीस-तेवीस वर्षांच्या तरूणीचे पात्र होते. आतापर्यंत मला बोल्ड आणि निगेटिव्ह भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. त्यामुळे माझ्या मनात आले की मला प्रॉस्टिट्युटसाठी विचारले असेल. ऑडिशनसाठी मी रोहन मापुसकर यांच्या असिस्टंटला ड्रेस कोड विचारला असता त्यांनी सिंपल गर्ल असल्याचे सांगितले आणि आलिया जी वीस बावीस वर्षांची मुलगी आहे त्यासाठी ऑडिशन द्यायला सांगितले. सुरूवातीला थोडा मला धक्का बसला. पण मी खूप खूश झाले.


मीराने पुढे सांगितले की,  मला आतापर्यंत मराठी मालिकेत निगेटिव्ह आणि बोल्ड भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. मराठी मालिकेत मला बऱ्याचदा सांगण्यात आले होते की मराठी हिरोईन दया येणारी, सोज्वळ, सोशिक असली पाहिजे. ते तुझ्याकडे पाहून अजिबात वाटत नाही. त्यामुळे तुला पॉझिटिव्ह भूमिका मिळणार नाहीत. जेव्हा मला आलियासाठी विचारण्यात आले आहे म्हटल्यावर थोडी अवाक् झाले. मग घरच्या घरी ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवले. माझी निवड झाली. त्यानंतर मी समीत सरांशी बोलले कारण त्यात एक दोन बोल्ड सीन होते. मग मी लूक टेस्ट दिली. लूक टेस्ट दिल्यानंतरही माझी निवड झाली आहे याबद्दल मी साशंक होते. अखेर शूटिंगचा दिवस उजाडला आणि कन्फर्म झाले.


इंदौरी इश्कच्या शूटच्या पहिल्याच दिवशी मीराने बोल्ड सीन शूट केला. या अनुभवाबद्दल ती सांगते की, सेटवर मी माझा सहकलाकार ऋत्विक साहोरला भेटले. त्याने बऱ्याच हिंदी वेबसीरिज आणि सिनेमात काम केले आहे. पहिल्याच दिवशी समजले की बोल्ड सीन शूट करायचा आहे. पहिल्यांदा सेटवर  एकमेकांची ओळख झाली आणि समित सर म्हणाले चला, किसिंग सीन शूट करूयात. थोडा वेळ अवघडल्यासारखे झाले. मात्र सेटवर सर्व प्रोफेशनल वातावरण होते. त्यामुळे तो सीन सहजरित्या शूट झाला. वेगवेगळ्या मुंबईतील ठिकाणी शूटिंग झाले.


इंदौरी इश्कचा अनुभव खूप अप्रतिम होता. समित सर शूटदरम्यान सर्वांना सेटवर कम्फर्टेबल करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला खूप मज्जा आली.  रोहन मापुसकर यांनी माझे कास्टिंग केले त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे, असे मीरा म्हणाली.


मीरा जोशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच तिची कलर्स मराठी वाहिनीवर बायको अशी हव्वी ही मालिका दाखल झाली आहे. या मालिकेतून तिने दोन वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. याशिवाय तिची ऑरेंज लिली ही वेबसीरिज आणि वृत्ती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Meera Joshi's 'Indouri Ishq' webseries released, bold scene shot on day one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app