आपले स्वप्न उराशी बाळगून अनेक जण स्वप्नांची नगरी मुंबईत येतात. या मायानगरीने अनेक कलाकारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे आणि घडविले देखील आहे. असं असतानाही मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने मुंबईला गुड बाय केले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही बाब सांगितली आहे.

मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने बाय बाय मुंबई असे लिहिले होते. 


या फोटोत मृण्मयीने पॅकिंग करत असतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावर Time To Leave... Bye Bye Mumbai असे लिहिले होते. यावरून असेच वाटते की, मृण्मयी मुंबईला सोडून जात आहे. पण मृण्मयी नक्की कुठे शिफ्ट होतेय,अशी चर्चा रंगली आहे. 


कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यांसारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे. मृण्यमयीने फर्जंद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.


मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ चित्रपटातही दिसली होती. या सिनेमाच्या माध्यमातून मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Marathmoli actress left Mumbai and gave this information on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.