मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री उमा भेंडेंची सूनदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, आहे खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 07:00 AM2021-11-27T07:00:00+5:302021-11-27T07:00:00+5:30

फार कमी लोकांना माहित आहे की, उमा भेंडे यांची सूनदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Marathi famous Actress Uma Bhende's daughter-in-law is also a famous actress , She is very glamorous | मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री उमा भेंडेंची सूनदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, आहे खूप ग्लॅमरस

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री उमा भेंडेंची सूनदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, आहे खूप ग्लॅमरस

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीला लाभलेली सोज्वळ आणि तितकीच सुंदर अभिनेत्री म्हणून उमा भेंडे हे नाव आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. खरंतर उमा हे नाव त्यांना लता दिदींनीच दिले होते. त्यांचे मूळ नाव होते अनसूया साकरीकर. उमा भेंडे या मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यांनी १९६० सालच्या आकाशगंगा चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो अमुच्या गावा, दोस्ती, काका मला वाचवा, भालू, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटात त्यांनी काम केले होते.

मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी उमा यांनी विवाह केला. ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले. ‘श्री प्रसाद चित्र’ ही त्यांची निर्मिती संस्था, या माध्यमातून त्यांनी भालू, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटकचांदनी अशा चित्रपटांची निर्मिती केली. १९ जुलै २०१७ रोजी उमा भेंडे यांनी जगाचा निरोप घेतला.

उमा आणि प्रकाश यांना प्रसाद आणि प्रसन्न ही दोन मुले आहेत. प्रसाद हा त्यांचा थोरला मुलगा. प्रसाद भेंडे हा मराठी सिनेइंडस्ट्रीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळतो आहे. दुनियादारी हा त्याचा पहिलाच चित्रपट खूपच यशस्वी झाला. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. लोकमान्य, मितवा, वेलकम जिंदगी, प्यारवाली लव्हस्टोरी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सविता दामोदर परांजपे, बेफाम, सातारचा सलमान या लोकप्रिय चित्रपटासाठी त्याने काम केले आहे. लोकमान्य चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून गौरवण्यात आले होते.


उमा आणि प्रकाश भेंडे यांची सून म्हणजेच प्रसादची पत्नी हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव आहे श्वेता महाडिक. प्रसाद आणि श्वेताला एक मुलगा असून त्याचे नाव अभिर आहे. गुड्डन तुमसे ना हो पायेगा, कृष्णदासी, एक श्रीनगर स्वाभिमान या हिंदी मालिकेत तिने काम केले आहे. श्वेताने लोकमान्य-एक युगपुरुष या मराठी चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

तर प्रसन्न भेंडे हा उमा आणि प्रकाश यांचा धाकटा मुलगा आहे. किमया भेंडे हे प्रसन्नच्या पत्नीचे नाव असून हे दोघेही ‘Roger that production’ ही निर्मिती संस्था सांभाळत आहेत.

Web Title: Marathi famous Actress Uma Bhende's daughter-in-law is also a famous actress , She is very glamorous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.