प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या सिनेमात हिरकणीची भूमिका कोण साकारणार यावर विषयाची चर्चा चांगलीच रंगली होती. अखेर या गोष्टीवरुन पडद्या उचलला गेला आहे. हिरकणी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या पोस्टरवरुन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यात हिरकणीची भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्टरवर सोनाली कडेवर लहान मुलाला घेऊन उभी आहे. सोनालीने हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन दिले आहे, नगऱ्याचा नाद घुमला रायगडाच्या कानोकानी, महाद्वार ते बंद जाहले, सूर्य जाता मावळनी, तान्हा होता घरी एकटा, आईच्या मग डोळा पाणी..अवघा कडा उतरून आली, माय माऊली.. 


मुलासाठी अतिशय मोठं धाडस केलेल्या आईची ऐतिहासिक गोष्ट या सिनेमातून लोकांसमोर मांडण्यात येणार आहे. आतापर्यंत आपण पाठपुस्तकांच्या माध्यमातून वाचलेली ऐतिहासिक गाथा पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर पाहिला मिळणार आहे. 


सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हिरकणीच्या भूमिकामुळे सोनालीने आपल्यासमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे.    
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This Marathi actress will be seen in the historical role of 'Hirakani' on the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.