बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि तेदेखील सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतात. मराठी अभिनेत्री सरिता मेहेंदळेसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. सरिताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. हिरव्या रंगाच्या फिशकट ड्रेसमध्ये ती खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


'भागो मोहन प्यारे' मालिकेत तिने साकारलेली 'मधुवंती'ची भूमिका मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सरिताने अभिनय क्षेत्रात अनेक वर्ष स्ट्रगल केलं आहे आणि त्यानंतर तिला मधुवंतीची भूमिका मिळाली. मुळची सांगलीच्या असलेल्या सरिताने असे हे कन्यादान, स्वरस्वती मालिकेत देखील अभिनय केला आहे. तसेच ये चल असे नसते आणि अर्धसत्य अशा नाटकांमध्ये तिने आपल्या अभिनयची चुणूक दाखवली आहे.  

Web Title: Marathi actress sarita mehendale looking stunning in her instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.