अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. नुकताच प्रियाने एथनिक लूकमधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रिया या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. तिचा हा फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडले. प्रियाचा हा लूक तिच्या फॅन्सनादेखील आवडला आहे.  


प्रियाने टाइमपास, वजनदार, काकस्पर्श, आम्ही दोघी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तिने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागेश कुकुनूर यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले. 

Web Title: Marathi actress Priya bapat in ethnic look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.