Marathi Actress pooja zunjar died in pregnancy | बाळंंतपणात झाला अभिनेत्रीचा मृत्यू, बाळही दगावले

बाळंंतपणात झाला अभिनेत्रीचा मृत्यू, बाळही दगावले

ठळक मुद्देपूजा गरोदर असल्याने तिच्या घरातील सगळेच खूश होते. ती हिंगोली येथील गोरेगाव जिल्ह्यातील सेनगाव येथे राहत होती. प्रसूती कळा आल्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

पूजा विष्णू झुंजार या अभिनेत्रीचे वय 25 वर्षं होते. तिने दोन मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. ती गरोदर असल्याने गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण आता तिच्याविषयी एक वाईट बातमी आली आहे. बाळंतपणात तिचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

पूजा गरोदर असल्याने तिच्या घरातील सगळेच खूश होते. ती हिंगोली येथील गोरेगाव जिल्ह्यातील सेनगाव येथे राहत होती. प्रसूती कळा आल्यानंतर तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वानवा असल्याने तिच्यासह तिच्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे त्या दोघांना आपला जीव गमवावा लागला असा तिच्या घरातल्यांनी आरोप केला आहे. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कामगिरीबाबत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे. 

पूजाची रविवारी पहाटे दोनच्या सुमारास प्रसूती झाली. मात्र काहीच वेळात तिच्या बाळाचा मृत्यू झाला. यानंतर पूजाची प्रकृती देखील ढासळली. तिला पुढील उपचारासाठी हिंगोलीमधील मोठ्या रुग्णायलात नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. पण दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी त्यांच्याकडे रुग्णावाहिकाच नव्हती. त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका शोधण्यात खूप वेळ गेला. रुग्णवाहिका मिळाल्यानंतर तिला हिंगोली येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi Actress pooja zunjar died in pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.