Marathi Actress Pooja sawant's photo became Preganant before marriage goes viral, know what happened | लग्नाआधीच प्रेग्नंसीच्या फोटोंमुळे या मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर माजवली होती खळबळ, हे होते कारण

लग्नाआधीच प्रेग्नंसीच्या फोटोंमुळे या मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर माजवली होती खळबळ, हे होते कारण

सध्या बॉलिवूड असो किंवा मग बॉलिवूड सोशल मीडियाचा वापर करत अभिनेत्री त्यांची प्रेग्नंसी खूप ग्लॅमरस करत फुल ऑन एन्जॉय करताना दिसताये. बॉलिवूडमध्ये करिना कपूर, नेहा धुपिया, जेनिलिया डिसोझा, समीरा रेड्डी, आणि आता कल्की कोचलीन हे त्याचे उत्तम उदाहरण. मात्र  आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्रीचा प्रेग्नंट असल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहताच अनेकांना धक्का बसलाय कारण ही अभिनेत्री आहे पूजा सावंत. होय, व्हायरल झालेला फोटोत पूजा सांवत प्रेग्नंट असल्याचं दिसतंय. हा फोटो जुना असला तरी आता पुन्हा अचानक हा फोटो सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

 


दोन वर्षापूर्वीचा हा फोटो असून जेव्हा पहिल्यांदा हा फोटो समोर आला होता. तेव्हा तिचा हा फोटो पाहून तिला अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले होते. काही दिवसानंतर या फोटोचे मागचे रहस्यही समोर आले होते. पूजाने अगदी विद्याबालन स्टाईलन सिनेमासाठी हा प्रमोशन फंडा वापरला होता. विद्या बालनने कहानी सिनेमासाठी प्रेग्नंट बनत मुंबईच्या टॅक्सीमध्ये फिरत सिनेमाचे प्रमोशन केले होते. त्यामुळे विद्या बालन स्टाइलने पूजा सांवत प्रमोशन करत असल्याचेही बोलले गेले.


सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी गरोदर असल्याचे भासवत तिने प्रमोशन केले होते. तिच्या अशी हटके स्टाइल पाहून सा-यांनीच तिचे कौतुकही केले होते. 'लपाछपी' या सिनेमासाठी तिने इतका खटोटप केला होता. आणि हा सिनेमा १४ जुलै 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi Actress Pooja sawant's photo became Preganant before marriage goes viral, know what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.