चॅलेंज! फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:56 PM2022-01-25T12:56:23+5:302022-01-25T12:58:01+5:30

होय, मराठी सिनेसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्रीचा बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्याला कारणही तसं खास आहे. आज या मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.

marathi actress pooja sawant birthday her childhood photo viral on social media | चॅलेंज! फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री

चॅलेंज! फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री

Next

बॉलिवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होतांना तुम्ही नेहमीच बघता. आता जरा हा फोटो बघा. होय, मराठी सिनेसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्रीचा बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्याला कारणही तसं खास आहे. आज या मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. आता ती कोण? तर फोटोतील या अभिनेत्रीचं नाव आहे पूजा सावंत (Pooja Sawant).

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. वेगवेगळे कलरफुल फोटो शेअर करत चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. एका फॅन पेजने तिचा हा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

2008 साली पूजाने श्रावणक्वीन ही स्पर्धा जिंकली आणि तिचा चेहरा सर्वांच्या नजरेत भरला. या गोड चेहऱ्यानं अनेकांची मनं जिंकली. या स्पर्धेचा जज असलेल्या सचित पाटीलने पूजाचा अभिनय आणि नृत्यकौशल्य पाहून तिला आपल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटासाठी विचारणा केली. पूजानेही लगेच होकार दिला आणि  मराठी सिनेमात तिची एन्ट्री झाली. ‘क्षणभर विश्रांती’ हा पूजाचा पहिला सिनेमा गाजला. या सिनेमानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

झकास, नवरा माझा भवरा, पोस्टर बॉईज, सांगतो ऐका अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं. ‘दगडी चाळ’ या सिनेमाने तिला कलरफुल ही ओळख मिळवून दिली आणि हाच सिनेमा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.   बस स्टॉप, विजेता, बोनस या सिनेमातील तिच्या भूमिकांचंही अपार कौतुक झालं. 
पुढे पूजा बॉलिवूडपटातही झळकली. ‘जंगल’ या सिनेमात ती झळकली. पूजा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. चाहत्यांसाठी ती तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Web Title: marathi actress pooja sawant birthday her childhood photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app