मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे नव्या लूकमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 07:15 AM2019-10-19T07:15:00+5:302019-10-19T07:15:00+5:30

अभिनेत्री मानसी मोघे गेल्या दोन वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

Marathi actress Mansi Moghe looks very glamorous in the new look, see her photo | मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे नव्या लूकमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे नव्या लूकमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

Next


२०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री मानसी मोघे हिने पदार्पण केलं. या चित्रपटानंतर ती २०१६ साली आणखीन एका मराठी चित्रपटात झळकली. त्यानंतर ती मराठी सिनेसृष्टीत काम करताना दिसली नाही. मात्र सध्या ती मॉडेलिंग करत असल्याचं समजतंय.

मानसी मोघेना नवा लूक केला असून तिने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.


फॅशनच्या जगात महत्त्वाचा समजला जाणारा मिस दिवा २०१३चा किताब मानसी मोघेने मिळवला. तसेच मानसीनं रशियात पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारातचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत ती टॉप १०मध्ये होती.

मानसीनं २०१५ साली अभिनय क्षेत्रात मराठी चित्रपटसृष्टीतून पदार्पण केलं. ती बुगडी माझी सांडली गं या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती. तिच्यासोबत अभिनेता कश्यप परूळेकर मुख्य भूमिकेत होता.

हा चित्रपट लावणीप्रधान होता आणि या चित्रपटात तिने सात लावण्या केल्या होत्या. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. त्यानंतर २०१६ साली ऑटोग्राफ चित्रपटातही ती झळकली होती.


गेल्या दोन वर्षांपासून ती मराठी सिनेसृष्टीतून गायब झाली आहे. मात्र सध्या ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटोशूट व मॉडेलिंगचे फोटो पहायला मिळत आहेत. 


मानसी सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे वेगवेगळ्या अदांमधील फोटो पहायला मिळतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi actress Mansi Moghe looks very glamorous in the new look, see her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app