Marathi Actress Manasi Naik Dazzeles In Cherry Colour Outfit | ‘चेरी बॉम्ब’ तुम्ही बघितला आहे?, पाहा मानसी नाईकच्या घायाळ करणाऱ्या अदा
‘चेरी बॉम्ब’ तुम्ही बघितला आहे?, पाहा मानसी नाईकच्या घायाळ करणाऱ्या अदा

मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे.कायमच आपल्या फॅशन स्टेटमेंटने ती रसिकांवर जादू करत असते. आता पुन्हा एकदा मानसीनं रसिकांवर जादू केली आहे. यावेळी तिनं आपल्या डान्सनं नाही तर आपल्या खास लूकनं रसिकांना आकर्षित केलं आहे. तिचे बघतोय रिक्षावाला या गाण्याची रसिक आजही आनंद लुटताना दिसतात. आपल्या डान्सने आणि अप्रतिम सौंदर्याने मानसी रसिकांची लाडकी बनली आहे. मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. इथं ती स्वतःचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवादही साधते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. तिने मरून रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या मादक अदा पाहायला मिळत आहेत. तिने परिधान केलेला ड्रेस चेरीच्या रंगाप्रमाणे आहे. त्यामुळे या फोटोंना मानसीने चेरी बॉम्ब हे कॅप्शन दिले आहे. मानसीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून ती आपल्या डान्सचे जलवे दाखवते. 

याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसी रसिकांची मनं जिंकली आहेत. 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.मानसीच्या प्रत्येक गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना पाहायला मिळते.


Web Title: Marathi Actress Manasi Naik Dazzeles In Cherry Colour Outfit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.