मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. अमृताने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती पाठमोरी उभी आहे. फोटोतील तिचा सिंपल लूक कुणालाही आवडले असाच आहे. तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोला अमृताने, ''कभी धुप कभी बादलों की ये लड़ियाँ'' असे कॅप्शन दिले आहे. 


छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं'या मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा आहे. हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असलेला हा चित्रपट निश्चितपणे प्रेक्षकांची दाद मिळवणार असल्याचं या ट्रेलरवरून कळतं. या चित्रपटात अमृता स्वीटीची भूमिका साकारते आहे.अमृताचे फॅन्स तिचा हा सिनेमा पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील. 

Web Title: Marathi actress amruta deshmukh looking gorgeous in her yellow dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.