मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती.नुकतेच प्रदीपने दोघांचे एअरपोर्टवरील फोटो शेयर केले आहेत. ते दोघे हनीमूनला जात आहेत का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र याचे उत्तम प्रदीप खरेराच्या व्लॉगमधून समोर आले आहे.

मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेराने इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मानसी आणि प्रदीपने एकाच रंगाचे टीशर्ट परिधान केले आहेत. हे नवीन जोडपे हनीमूनला जात आहेत की काय असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता.

मात्र प्रदीप खरेराचे व्हिडीओ चॅनेल असून त्याने युट्यूबला नुकताच एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमधून समजते आहे की, ते दोघे फरीदाबादहून मुंबईत परतले आहेत.

मानसीचा भावी पती हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.


मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत. एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mansi Naik, her husband Pradip Kharera went on a honeymoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.