मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर आता अभिनेत्री मानसी नाईकही लग्नबंधनात अडकली आहे.'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. अखेर रेशीमगाठीत अडकली आहे. इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासह  तिचं शुभमंगल नुकतंच  पार पडलं. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. 

मानसीच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत.  या फोटोंमध्ये नववधू मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती  शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. या दोघांचे हे लव्ह मॅरेज आहे. गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते अखेर कुटुंबियांच्या समंतीने दोघेही आज लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहेत. समोर आलेल्या फोटोंंमध्ये दोघांचीही चांगलीच केमिस्ट्री असल्याचे फोटो पाहून दिसते. 


गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड. भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Manasi Naik Got Married To boxer Pardeep Kharera, See Wedding First Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.