अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. आपला सहज सुंदर अभिनय आणि एकसे बढकर एक सिनेमांमुळे  आपली छाप रसिकांवर पाडली आहे. लक्ष्मी सिनेमात शरदच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अक्षय कुमार हिरो असलेला लक्ष्मी सिनेमात शरद केळकरनेच रसिकांची सर्वाधिक पसंती मिळवली आहे. सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात. शरदही सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या फॅन्सशी संवाद साधत असतो. आपले फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत  असतो.

दिवसेंदिवस त्याच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे.  याच फॅन्सनी त्याला दिवाळीचं खास गिफ्टही दिलंय असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.  सोशल मीडिया अकाउंटवर शरद केळकरने ५ लाखापेक्षा अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. यामुळे शरद खूप खूश असून त्याने आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच  तितकंच खास असतं. आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत.

लय भारी! कधीकाळी जीम इंस्ट्रक्टर होता शरद केळकर, एका स्पर्धेने बदलले आयुष्य

शरद मुंबईत आला आणि यादरम्यान अचानक त्याला मिस्टर इंडिया 2002 या स्पर्धेबद्दल समजले. शरदला फॅशनकडे सुरुवातीपासूनच ओढा होता. याचमुळे अगदी ऐनवेळी शरद आपल्या एका मित्रासोबत या स्पर्धेत पोहोचला. अगदी हौस किंवा मौजमस्ती म्हणून त्याने या स्पर्धेत रॅम्पवॉक केला. हा रॅम्पवॉक आपले आयुष्य बदलणारा ठरेल, असे शरदला स्वप्नातही वाटले नसावे. याचठिकाणी शरद अनेकांच्या डोळ्यांत भरला आणि त्याच्या नशीबाने कलाटणी घेतली.


2004 मध्ये ग्रासिम मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाला. या शरद फायनलिस्ट होता. स्पर्धा जिंकली नाही. पण या स्पर्धेनंतर त्याचे आयुष्यच बदलले. यानंतर अनेक शोमध्ये शरदने रॅम्पवॉक केले. याचवर्षी ‘आक्रोश’ या दुरदर्शनवरील मालिकेतून त्याने इंडस्ट्रीत प्रवेश केला. 2007 मध्ये पहिल्यांदा रॉक अ‍ॅण्ड रोल फॅमिली हा शो होस्ट केला. यानंतर सारेगामापा चॅलेज, पती,पत्नी और वो सारखे मोठमोठे शो होस्ट करताना तो दिसला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Laxmii Actor Sharad Kelkar Reaches Half A Million Followers On Instagram PICS Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.