कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 03:50 PM2019-11-08T15:50:38+5:302019-11-08T15:56:09+5:30

कृष्णा मालिकेतील बलरामाची भूमिका दीपक देऊळकर यांनी साकारली होती. त्यांनी या मालिकेप्रमाणेच सपने साजन के, लेक लाडकी या घरची यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

krishna serial balram aka deepak deulkar is husband of nishigandha wad | कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री

कृष्णा मालिकेत बलरामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे मराठीतील ही दिग्गज अभिनेत्री

Next
ठळक मुद्देनिशिगंधा आणि दीपक यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांना मुलगी देखील आहे. तिचे नाव इश्वरी असून ती दिसायला खूपच छान आहे.

कृष्णा ही मालिका त्या काळात चांगलीच गाजली होती. या मालिकेतील बलरामाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही भूमिका अभिनेता दीपक देऊळकर यांनी साकारली होती. त्यांनी या मालिकेप्रमाणेच लेक लाडकी या घरची, सपने साजन के यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांचे लग्न मराठीतील एका दिग्गज अभिनेत्रीसोबत झाले आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निशिगंधा वाड आहे.

निशिगंधा वाड यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी नव्वदीच्या दशकात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी त्यांची गणना केली जात असे. त्या केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक लेखिका देखील आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांनी शेजारी शेजारी, एका पेक्षा एक, बंधन, प्रतिकार यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी तुमको ना भूल पाएँगे, दिवानगी, रेस ३, आप मुझे अच्छे लगने लगे यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्या काही वर्षांपूर्वी ससुराम सिमर का, सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या हिंदी मालिकांमध्ये देखील झळकल्या होत्या.

स्टार प्रवाहवर सध्या सुरू असलेल्या श्री गुरुदेव दत्त या मालिकेचे ते आणि निशिगंधा वाड निर्माते असून ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. प्रसिद्ध लेखिका विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई असून त्यांची अनेक पुस्तकं गाजली आहेत. निशिगंधा आणि दीपक यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असून त्यांना मुलगी देखील आहे. तिचे नाव इश्वरी असून ती दिसायला खूपच छान आहे.

Web Title: krishna serial balram aka deepak deulkar is husband of nishigandha wad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app