नऊवारी साडीत किशोरी शहाणे थिरकल्या बडी मुश्कील गाण्यावर, व्हिडिओ झाला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 06:30 PM2021-06-10T18:30:05+5:302021-06-10T18:31:09+5:30

किशोरी शहाणे यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Kishori Shahane dancing on badi mushkil song, video goes viral | नऊवारी साडीत किशोरी शहाणे थिरकल्या बडी मुश्कील गाण्यावर, व्हिडिओ झाला व्हायरल

नऊवारी साडीत किशोरी शहाणे थिरकल्या बडी मुश्कील गाण्यावर, व्हिडिओ झाला व्हायरल

Next
ठळक मुद्देया व्हिडिओत नऊवारी साडी नेसलेल्या किशोरी बडी मुश्कील या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. ते आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपले चित्रीकरणादरम्यानचे फोटो, खाजगी आयुष्यातील फोटो पोस्ट करत असतात. तसेच ते कुठे फिरत आहेत, काय करत आहेत याविषयी त्यांच्या चाहत्यांना सांगत असतात. अभिनेत्री किशोरी शहाणे देखील सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

किशोरी शहाणे यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत नऊवारी साडी नेसलेल्या किशोरी बडी मुश्कील या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. किशोरी या अफलातून नाचतात असे त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

किशोरी शहाणे शाळेत असताना त्यांनी 'दुर्गा झाली गौरी' या नृत्यनाटिकेत काम केले होते. त्‍यानंतर मग राज्यस्तरीय नाटक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्याचदरम्यान त्यांनी वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शतुरमुर्ग' या हिंदी नाटकात काम केले. असे करता करता मग 'मोरूची मावशी' या व्‍यावसायिक नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. त्यानंतर ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सचिन पिळगावकर यांच्या ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटात काम केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले असून त्यांची जोडी विशेष करून अशोक सराफ यांच्यासोबत गाजली.

किशोरी शहाणे यांनी मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. तसेच अनेक हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kishori Shahane dancing on badi mushkil song, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app