या ‘ब्रँड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा...! राज ठाकरेंसोबत ‘तो’ फोटो अन् केदार शिंदे ‘ती’ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 05:44 PM2020-09-14T17:44:59+5:302020-09-14T17:46:03+5:30

केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबत एक मस्त कॅप्शन...

kedar shinde share old photo with raj thackeray post viral on social media | या ‘ब्रँड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा...! राज ठाकरेंसोबत ‘तो’ फोटो अन् केदार शिंदे ‘ती’ पोस्ट

या ‘ब्रँड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा...! राज ठाकरेंसोबत ‘तो’ फोटो अन् केदार शिंदे ‘ती’ पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देजेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे, असे राऊत यांनी या लेखात लिहिले होते.

ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. राज ठाकरेही या ब्रँडचेच घटक आहेत, असे मत अलीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडले होते. कंगना राणौत वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी राज ठाकरेंना साद घातली होती. राऊतांच्या या लेखाची बरीच चर्चा झाली होती, यावर काही प्रतिक्रियाही उमटल्या होता, लेखाची ही अशी चर्चा सुरु असताना दिग्दर्शक केदार शिंदे यांना  राज ठाकरे या ‘ब्रँड’वरचे प्रेम व्यक्त केले आहे. केदार शिंदे यांनी राज ठाकरेंबद्दल केलेले एक ट्विट सध्या तुफान व्हायरल होतेय.
केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबत एक मस्त कॅप्शन...

‘या ब्रँडच्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा फोटो मिळवण्याची धडपड होती. कधी मांडीला मांडी लावून बसेन, मैत्री होईल असं स्वप्नातही वाटतं नव्हतं!!,’ असे केदार यांनी लिहिले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
‘ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा या ब्रँडचे   घटक आहेत. या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मध्यला काळात मुंबईला पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणा-या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणा-यामागे भाजपा उभा राहतो हे दुर्देवच म्हटले पाहिजे.

"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक

तुम्ही वापरलेला 'तो' शब्द निषेधार्ह; केदार शिंदेंनी राऊतांना करून दिली शिवरायांची आठवण

आज मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरु आहे. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचा एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एका वृत्तवाहिनीचा संपादक त्यांच्यामागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे, असा हा कठीण काळ आलाच आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची. पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे, असे राऊत यांनी या लेखात लिहिले होते.
 

Web Title: kedar shinde share old photo with raj thackeray post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.