ठळक मुद्देगोष्ट एका पैठणीची या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी... पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य... आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशीओ फिल्म्सची निर्मिती असलेला आणि शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित ''गोष्ट एका पैठणीची'' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सायलीने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील तिची भूमिका अतिशय वेगळी आहे. या  चित्रपटात सायलीसह इतर नावाजलेल्या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका असून त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. २४ नोव्हेंबरपासून भोर, पुणे, मुंबई आणि कोकण अशा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकेशन्सवर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असणारा 'ए बी आणि सी डी' हा चित्रपट जानेवारी महिन्यात सर्वत्र प्रदर्शित होईल. त्यापाठोपाठ एका आगळ्यावेगळ्या विषयावरच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची प्लॅनेट मराठीकडून निर्मिती करण्यात येणार आहे.

दिग्दर्शक मिलिंद लेलेंच्या 'ए बी आणि सी डी' या बहुचर्चित चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर महाराष्ट्राच्या मातीतला काहीतरी वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्याची इच्छा होती. ती इच्छा 'गोष्ट एका पैठणीची' निमित्ताने पूर्ण झाली. वेगळी गोष्ट आणि दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांची जिद्द पाहून आम्ही या भन्नाट ''गोष्ट एका पैठणीची'' या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मग सिनेविश्वातील इतर कलाकारांना संधी देण्यापेक्षा आम्ही 'प्लॅनेट टॅलेंट'चा चेहरा असणाऱ्या सायलीला वेगळ्या लूक आणि भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आणण्याचं ठरवलं. आमच्या या नव्या कालाकृतीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतील आणि प्रेक्षकांनाही आमचा हा प्रयत्न नक्की आवडेल, असं प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितलं. 

Web Title: kahe diya pardes fame sayali sanjeev will be main lead in Marathi movie Goshta Eka Paithanichi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.