चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.

जितेंद्र अभिनयासह सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपले मित्र आणि चाहत्यांसोबत संवाद साधतो. जितेंद्र जोशीच्या लग्नाला नुकतेच दहा वर्षे पूर्ण झाले. त्याने त्याच्या पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

जितेंद्र जोशीने पत्नी मिताली जोशी सोबतचे फोटो शेअर करीत म्हटले की १० वर्षे, चले चलो.


तर मिताली जोशीने जितेंद्र जोशीसोबतचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत जितेंद्रला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


अभिनेता जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असून ती गृहिणी आहे. मिताली चित्रपट व नाटकांचे लेखन करते आणि तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले आहे.

मिताली आणि जितेंद्र यांना एक मुलगी आहे जिचे नाव रेवा आहे. 


सेक्रेड गेम्स या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये काटेकरची भूमिका जितेंद्र जोशीने साकारली होती. या भूमिकेतून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

Web Title: Jitendra Joshi celebrated 10th wedding anniversary, see his wife photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.