'प्रेम करते तुझ्यावर..., आय लव्ह यू', परश्याने मिस्ट्री गर्लच्या फोटोनंतर शेअर केले लव्ह लेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:04 PM2021-10-13T16:04:08+5:302021-10-13T16:04:40+5:30

परश्या उर्फ आकाश ठोसरने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन या लव्ह लेटरचा फोटो शेअर केला आहे.

'I love you ..., I love you', Parsha Aka Akash Thosar shared a love letter after the photo of Mystery Girl | 'प्रेम करते तुझ्यावर..., आय लव्ह यू', परश्याने मिस्ट्री गर्लच्या फोटोनंतर शेअर केले लव्ह लेटर

'प्रेम करते तुझ्यावर..., आय लव्ह यू', परश्याने मिस्ट्री गर्लच्या फोटोनंतर शेअर केले लव्ह लेटर

Next

सैराट चित्रपटातून एका रात्रीत लोकप्रिय झालेला परशा उर्फ आकाश ठोसर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वी तो मिस्ट्री गर्लसोबतच्या फोटोमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर आता त्याने चक्क लव्ह लेटर इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. या लव्ह लेटरची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. हे लेटर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
 
हे लव्ह लेटर ज्या व्यक्तीसाठी लिहिण्यात आले आहे त्याचे नाव आकाश आहे. या लेटरमध्ये लिहिले आहे की, “प्रिय आकाश, तू मला प्रपोज केले आणि तुला मी जे काही म्हटले, त्यासाठी सर्वात आधी सॉरी. नंतर मी विचार केला आणि माझे मन सांगत होते तूच आहेस तो ज्याची मी वाट पाहते. जर माझ्या आधी तुला कोण आवडत असेल, तर नाही म्हटलेस तरी चालेल. तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल, तर हो म्हण. माझे हृदय तुला दिले आहे, तुझे हृदय मला दे, प्रेम करते तुझ्यावर एवढे तरी समजून घे, तुझी अंकिता.
हे लेटर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आकाश ठोसरच्या काही चाहत्यांनी या पत्रामधील आकाश हा आपलाच लाडका अभिनेता आकाश आहे असे वाटले आणि त्यांनी हे लेटर आकाश ठोसरला पर्सनल मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात केली. अखेर बऱ्याच जणांचा मेसेज आल्यानंतर आकाश ठोसरने इन्स्टाग्राम स्टोरीवर हे लव्ह लेटर शेअर करत सांगितले की, मित्रांनो तो आकाश मी नाही आहे. सगळे मलाच पाठवत आहेत.


आकाश ठोसरने सैराटनंतर एफयूः फ्रेंडशिप अनलिमिडेट या चित्रपटात काम केले. हिंदी वेबसीरिज लस्ट आणि १९६२ः द वॉर इन द हिल्समध्ये तो झळकला. नागराज मंजुळे दिग्दर्शित, अमिताभ बच्चन अभिनीत झुंड चित्रपटात आकाश झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरूदेखील पहायला मिळणार आहे.

Web Title: 'I love you ..., I love you', Parsha Aka Akash Thosar shared a love letter after the photo of Mystery Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app