How Sai tamhankar Celebrates Valentine's Day with Childhood Throwback Picture | 'या' चिमुकलीला तुम्ही नक्कीच ओळखले असणार, आज बनली आहे लाखों दिलोंची धडकन

'या' चिमुकलीला तुम्ही नक्कीच ओळखले असणार, आज बनली आहे लाखों दिलोंची धडकन

रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत सई ताम्हणकरने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे. म्हणूनच आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून तिची गणना होते. 


नुकताच सोशल मीडियावर सईने तिच्या लहानपणातला एक फोटो शेअर करत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत लहानग्या सईचा क्युट अंदाज पाहायला मिळतोय. या फोटोत चेह-यावर स्मित हास्य, डोळ्यात नवं तेज आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे. विशेष म्हणजे सई लहानपणापासूनच टॉमबॉय असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होते. फोटोत लहानग्या सईचा हेअरबँड आणि हेअरस्टाईल पाहून चाहते 'कुछ कुछ होता' मधील अंजलीप्रमाणे दिसत असल्याचे  सांगतायेत.  या फोटोला सोशल मीडियावर बरेच लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. तसंच हा व्हिडिओ व्हायरल होतोय. या फोटोच्या निमित्ताने सईने तिच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


सई ताम्हणकरचा आगामी सिनेमा मिडियम स्पायसी 5 जूनला रसिकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमात सई व्यतिरिक्त पर्ण पेठे आणि ललित प्रभाकरही झळकणार आहे. जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How Sai tamhankar Celebrates Valentine's Day with Childhood Throwback Picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.