'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. याच मालिकेतील सुरज म्हणजेच सनी दा हा प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनला आहे. अभिनेता राज हंचनाळे हि व्यक्तिरेखा साकारतोय. राज सध्या चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवत देखील आहे. सागर कारंडे याच्या साताऱ्याचे शिलेदार या टीमचा राज सदस्य आहे. 

 

राज याने इंजिनिअरिंग केल्यानंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. एका सामान्य मध्यवर्गीय कुटुंबात वाढलेल्या राजसाठी हा खूप मोठा निर्णय होता. त्या काळात राजला डिप्रेशन देखील आलं होतं. पण फु बाई फु मध्ये सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, भाऊ कदम यांचे परफॉर्मन्स पाहून राज आपलं सगळं नैराश्य दूर करत होता. याबद्दल बोलताना राज म्हणाला, "इंजिनिअरिंग सोडून अभिनयात येणं हा खूप महत्वाचा निर्णय होता आणि एका सामान्य कुटुंबात असताना स्वतः असा मोठं निर्णय घेणं हे खूपच अवघड असतं. 


जेव्हा त्यावेळी मला डिप्रेशन आलं होतं तेव्हा याच विनोदवीरांनी मला हसवलं. दिवसभर थकून घरी आल्यावर मी यांचे परफॉर्मन्सेस पाहून १ तास माझा सर्व ताण विसरून जायचो. आता हीच जबाबदारी माझ्यावर आहे. 'चला हवा येऊ द्या' शेलिब्रिटी पॅटर्न या कार्यक्रमातून मी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे. एखाद्या प्रेक्षकांची मानसिकता माझ्या जुन्या दिवसांसारखी असू शकते त्यामुळे त्यांचं नैराश्य माझ्या परफॉर्मन्स पाहून दूर झालं पाहिजे यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करतोय."


Web Title: This Is How Marathi Actor Raj Hanchanale overcame His depression
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.