नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात नेहा सोबत प्रसाद ओक, सुव्रत जोशी व मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात नेहाने साकारलेल्या भूमिकेतून तिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिचा बोल्ड अंदाज पहायला मिळतो आहे.
 
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते. नुकतेच तिने तेजस नेरूरकरने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलेलं ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्यात ती खूप हॉट दिसते आहे. 

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.


इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे. 'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.


नेहा आणखीन एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. पण ती यात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Hotness Overloaded ...! Neha Khan's bold photos on Social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.