पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.

पूजा सावंत सोशल मीडिया सक्रीय असून नेहमी ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.


पूजाने शेअर केलेल्या फोटोत तिने नेटचा ट्रान्सपरेंट टॉप घातला आहे. तिचे हे फोटोशूट तेजस नेरूरकरने केले आहे. तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

पूजाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. मात्र आता केलेले बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


पूजाने 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.

यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली.

Web Title: Hotness Alert! Pooja Sawant shared photos in Transparent Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.