'रावरंभा'तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी, पोस्टर झाले प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:17 PM2021-03-31T19:17:26+5:302021-03-31T19:17:52+5:30

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडलेली आहे.

A historical love story unfolding from 'Ravaramba', a poster was displayed | 'रावरंभा'तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी, पोस्टर झाले प्रदर्शित

'रावरंभा'तून उलगडणार एक ऐतिहासिक प्रेमकहाणी, पोस्टर झाले प्रदर्शित

googlenewsNext

येत्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातून शिवकालातील कथानक रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. 'रावरंभा'तून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. 

शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे श्री शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे 'रावरंभा - द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४'. या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट, करंट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी रावरंभाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच आता सुरु होणार असून चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Web Title: A historical love story unfolding from 'Ravaramba', a poster was displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.