आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती सेलिब्रेटी आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. तसेच चाहत्यांसह संवादही साधत असतात.नुकतेच गायिका सावनी रविंद्रने काही फोटो शेअर केले आहेत. मुळात तिला भटकंतीची फार आवड आहे. आपल्या कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.

नुकतेच शेअर केलेले तिचे हे फोटो तिच्या ऑस्ट्रेलिया  टूरचे आहेत. ती ऑस्ट्रेलियामध्ये व्हॅकेशनसाठी गेली त्यावेळी तिने तेथील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत रम्य स्थळांना आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. शहरातील विविध स्थळांना सावनीने भेट तर दिलीच शिवाय तेथील संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या फोटोला शेअर करत तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. सावनीच्या  या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 


सावनीने तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली. पारंपारिक चौकटीतील गायनाला तडा देत काहीतरी हटके गायनाच्या प्रयत्नात असलेल्या सावनीने कायम वेगवेगळया गाण्यांचे प्रकार रसिकांसमोर सादर केले. मुळात सावनी फक्त गायनामुळेच नाही तर तिच्या वेगवेगळ्या कामांमुळेही तिला रसिकांचे भरभरून प्रेम मिळते. नुकताच तिचा वाढदिवस झाला. तिने आपला वाढदिवस मुंबईतल्या कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. या आधी सावनीने वाढदिवसाच्या दिवशी पुण्यातल्या मातोश्री वृध्दाश्रमात जाऊन साजरा करत होती. यंदा आपला वाढदिवस सावनीने मुंबईतल्या  ‘सुलभा स्पेशल स्कुल’ मध्ये जाऊन साजरा केला होता.

 “फक्त पार्टी करून आणि गिफ्ट्स घेऊन वाढदिवस साजरा करणे, मला कधीच आवडले नाही. माझ्या वाढदिवशी कोणातरी गरजू व्यक्तिच्या चेह-यावर हसु फुलवावे, आणि त्या व्यक्तिला आवश्यक भेटवस्तू द्यावी असे मला फार पुर्वी पासूनच वाटायचे आणि मग त्यातूनच मी वाढदिवस अशा वेगळ्या पध्दतीने दरवर्षी साजरा करयचा संकल्प केला.  दरवर्षी मी पूर्णही करतेय, ह्याचा अर्थातच मला आनंद आहे.” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Have you seen the photos shared by Sawani Ravindra? Read More About her Memorable Australia Vacation Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.