सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री केली आणि तिने रसिकांचे मनोरंजन केले. त्यानंतर आता ती सध्या 'अनन्या' नाटकाद्वारे रसिकांचे मनोरंजन करत आहे.

'अनन्या' या नाटकातील भूमिकेसाठी आत्तापर्यंत ऋतुजाला तब्बल १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याच १२ पुरस्काराची दखल 'इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसने'ही घेतली होती. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये मोस्ट अ‍ॅवॉर्डस फॉर अ परफॉर्मन्स इन द इयर या अंतर्गत ऋतुजाच्या नावाची घोषणा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली होती.

आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. नुकतेच ऋतुजाने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. ऋतुजा हा बोल्ड लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

रसिकांकडून  ऋतुजाच्या  या फोटोंना बरेच लाइक्सही मिळाले होते. आता पुन्हा एकदा  ऋतुजाचा सेन्सेशनल बोल्ड अंदाज रसिकांसमोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.यातील एका फोटोत तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून विविध पोझ आणि पांढ-या रंगाचा शर्ट अशा अंदाजात  तिचा हा फोटो आहे.  ऋतुजाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

Web Title:  Have you seen the glamorous hot style of Rutuja Bagwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.