अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या भावी सूनेला पाहिलंत का?, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 09:00 AM2021-12-04T09:00:00+5:302021-12-04T09:00:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी आणि त्यांची पत्नी राणी गुणाजी यांच्या मुलाचा एगेंजमेंट नुकतीच पार पडली.

Have you seen actor Milind Gunaji's future bride? Find out about her | अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या भावी सूनेला पाहिलंत का?, जाणून घ्या तिच्याबद्दल

अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या भावी सूनेला पाहिलंत का?, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी आणि त्यांची पत्नी राणी गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा नुकताच पार पडला. मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांना अभिषेक हा एकुलता एक मुलगा आहे. अभिषेकच्या भावी पत्नीचे नाव राधा पाटील आहे. अभिषेक गुणाजी हा देखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.

अभिषेक आणि त्याची गर्लफ्रेंड राधा पाटील यांची नुकतीच एंगेजमेंट झाली आहे. अभिषेकने राधा सोबतच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळतो आहे. अभिषेक आणि राधा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे. राधा पाटील मेडिसिन क्षेत्राशी निगडित आहे. 


अभिषेकने रामणारायन रुईया कॉलेजमधून तसेच थदोमल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. अभिनय क्षेत्रात न येता अभिषेक दिग्दर्शनाकडे वळला आहे. चित्रपट, व्यावसायिक जाहिरात यांचे दिग्दर्शन त्याने केले असून गायनाची आणि फोटोग्राफीची देखील त्याला विशेष आवड आहे.

 त्याने ‘छल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात त्याचे वडील मिलिंद गुणाजी आणि सुमित राघवन यासारख्या कलाकारांनी काम केले होते. याशिवाय कर्जत जामखेड भटकंती सारख्या ट्रॅव्हल सिरीज आणि टिव्हीसी पाईप सारखी जाहिरात त्याने दिग्दर्शित केली आहे. एक दिग्दर्शक म्हणून अभिषेकला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळाले होते. याशिवाय आपलं कर्जत जामखेड या सीरीजचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

Web Title: Have you seen actor Milind Gunaji's future bride? Find out about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.