स्पृहा जोशीच्या लग्नाला झाली ६ वर्षे पूर्ण, नवरा वरदसोबतचा फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 11:52 AM2020-11-28T11:52:59+5:302020-11-28T11:53:21+5:30

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि वरद लघाटे २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी विवाहबंधनात अडकले. आज त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस आहे.

Happy 6th anniversary of Spruha Joshi's marriage, best wishes for sharing photo with Navra Varad | स्पृहा जोशीच्या लग्नाला झाली ६ वर्षे पूर्ण, नवरा वरदसोबतचा फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

स्पृहा जोशीच्या लग्नाला झाली ६ वर्षे पूर्ण, नवरा वरदसोबतचा फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. या गुणी अभिनेत्रीच्या लग्नाचा आज सहावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने नवरा वरदसोबतचा फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


स्पृहा जोशीने वरद सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय वरद... आनंदी सहावा.. या प्रवासासाठी मी खूप आभारी आहे. लव्ह यू. स्पृहाने दुसरा फोटो शेअर करत त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवसा आधीच सेलिब्रेशन केल्याचे सांगितले. 

अभिनेत्री स्पृहा जोशी आणि वरद लघाटे यांनी सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. २००८ पासून हे दोघे नात्यात होते आणि अखेर २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी हे दोघे विवाहबंधनात अडकले. वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. तो मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित होता. पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे. 


स्पृहा जोशी सध्या कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा - स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून तिचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावत आहे. याआधीच्या सिझनमध्ये देखील तिने सूत्रसंचालकाची भूमिका बजावली होती.

Web Title: Happy 6th anniversary of Spruha Joshi's marriage, best wishes for sharing photo with Navra Varad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.