'गो कोरोना गो...', प्रिया बापटने इंस्टाग्रामवर शेअर केला रील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 02:11 PM2021-04-07T14:11:50+5:302021-04-07T14:12:11+5:30

अभिनेत्री प्रिया बापटने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

'Go Corona Go ...', Priya Bapat shared a reel video on Instagram | 'गो कोरोना गो...', प्रिया बापटने इंस्टाग्रामवर शेअर केला रील व्हिडीओ

'गो कोरोना गो...', प्रिया बापटने इंस्टाग्रामवर शेअर केला रील व्हिडीओ

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच इंस्टाग्रामवर दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत सुधारल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान आता अभिनेत्री प्रिया बापटने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. 


प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि नेहमी ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक रील व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने गो कोरोना गो असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओत प्रिया ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे गाणं गाताना दिसते आहे. प्रियाच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.


उमेश कामत आणि प्रिया बापटने १७ मार्च रोजी सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. उमेशने लिहिले होते की, दुर्देवाने प्रिया आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघे होम क्वारंटाइन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्यावी किंवा स्वतःला आइसोलेट करून घ्या.


उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती.

Web Title: 'Go Corona Go ...', Priya Bapat shared a reel video on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.