बॉलिवूडप्रमाणे सध्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा कलाकारांच्या मुलांचा डेब्यू सुरु आहे. मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी आपल्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सलमान खानच्या ‘दबंग 3’मधून सई मांजरेकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सईनंतर गौरी इंगवलेसुद्धा आपलं पदार्पण करण्यास तयार आहे. मराठी सिनेसृष्टीचा लोकप्रिय चेहरा म्हणून महेश मांजरेकरकडे पाहिलं जातं. मांजरेकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 


पदार्पणा आधीच गौरी सोशल मीडियावर हिट आहे. सोशल मीडियावर गौरी बरीच अॅक्टिव्ह असते. हॉट आणि ग्लॅमरस फोटो  ती आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असते. तिच्या या फोटोंना फॅन्सची पसंती देखील मिळते. एकूणच पदार्पणा आधीच सोशल मीडियावर गौरीचा बोलबाला आहे.  


 वर्कफ्रंटबाबात बोलायचे झाले तर, गौरीला मेहश मांजरेकर आपला आगामी सिनेमा 'पांघरुण'मधून लाँच करणार आहेत. 'पांघरुण'मधून मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.सिनेमाची कथा एक विधावा महिल्याच्या आयुष्याभवती फिरणारी आहे.  बालकलाकार म्हणून गौरीने मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे मात्र खऱ्या अर्थाने गौरीच्या करिअरला सुरुवात आता होणार आहे.  

Web Title: Gauri ingawale hit on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.