ठळक मुद्देगश्मिरचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून बाप-मुलाची ही जोडी खूपच क्यूट असल्याचे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.गश्मिरचा हा व्हिडिओ काहीच तासांत ३२ हजाराहून अधिक लोकांना पाहिला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता म्हणून गश्मिर महाजनी ओळखला जातो. आपल्या अभिनयाने मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळवला. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. याच कारणामुळे त्याचा प्रत्येक चाहता त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. आपल्या जीवनातील सुखद क्षण, फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने शेअर केलेला एक व्हिडिओ त्याच्या फॅन्सना चांगलाच भावतोय.

गश्मिरने शेअर केलेल्या या व्हिडिओत गश्मिर त्याच्या घरात व्यायाम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तर त्याचा मुलगा त्याला सतावत असून तो त्याच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. गश्मिरदेखील आपल्या बाळाचा मुड पाहाता त्याचा व्यायामाचा बेत रद्द करून त्याला जवळ घेताना दिसत आहे. 

गश्मिरचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून बाप-मुलाची ही जोडी खूपच क्यूट असल्याचे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.गश्मिरचा हा व्हिडिओ काहीच तासांत ३२ हजाराहून अधिक लोकांना पाहिला आहे.

गश्मिर महाजनीच्या पत्नीचे नाव गौरी देशमुख असून २०१८ डिसेंबरमध्ये त्यांच्या घरी क्यूट बाळाचे आगमन झाले आहे. तो त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याच्या मुलासोबतचे फोटो पोस्ट करत असतो.

सिनेमासह गश्मिरने रंगभूमीही गाजवली आहे. अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ या भव्य महानाट्यात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. या महानाट्यात बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मिर महाजनीने साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी सिनेमातून झळकलेल्या अभिनेता गश्मिर महाजनीने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. अभिनेते रविंद्र महाजनी यांचा गश्मिर मुलगा आहे.

Web Title: gashmeer mahajani shares cute video with his son PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.