बिग बॉस मराठी शोमधून अभिनेत्री सई लोकूर घराघरात पोहचली. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सईने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले आहे. तिने त्याच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र तो व्यक्ती कोण आहे, हे सांगितले नव्हते. अखेर आज त्याचा उलगडा झाला. आज सईचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

तुम्ही सईच्या भावी नवऱ्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असाल ना. तिच्या भावी पतीचे नाव आहे तीर्थदीप रॉय आहे. आज सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयचा साखरपुडा पार पडला. यावेळी ते दोघे खूप आनंदात होते. यावेळी दोघांनीही पिवळ्या रंगाचे आउटफिट घातले होते. सईने या सोहळ्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सई लोकूरच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 

अभिनेत्री सई लोकुर 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली.

सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.

२०१५ साली तिने किस किसको प्यार करूँ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कपिल शर्मा, सिमरन कौर मुंडी व एली अवराम मुख्य भूमिकेत होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Finally, the 'Mystery Man' of Sai Lokur's life came to light, Sai Lokur shared engagment photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.