अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. 'बिग बॉस १२' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा पेंडसे सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. नुकतेच नेहाने इंस्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पांढऱ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले की, ती म्हणाली की तिला नेहमीच कवी व्हायचं आहे, पण मी सांगू शकते, तिला खरोखर पाहिजे असलेल्या एखाद्याच्या कवितेत असणे आवश्यक होते.


नेहा पेंडसेच्या साडीतल्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. पांढऱ्या रंगाच्या साडीवर तिने गोल्डन रंगाचे मोठे इअररिंग्स घातले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.


नेहा पेंडसे सध्या भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारते आहे. आपल्या अदांनी तिने या भूमिकेला चार चांद लावले आहेत.

नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fans were shocked to see Neha Pendse's saree.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.