अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सध्या तिने आपल्या फोटोंतून चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते आहे. नुकताच श्रुतीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 


श्रुती मराठे हिने फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच बारीक दिसते आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, चेहऱ्यावरील हास्यासाठी कारण नसेल तर लोक तुम्हाला वेडे ठरवतील. पण माझ्याकडे हास्यासाठी कारण आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. तिच्यातील बदलाचे खूप कौतूक होताना दिसते आहे. 

श्रुती मराठे हिने लॉकडाउनमध्ये वजन घटविले आहे आणि तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले होते. डाएट आणि एक्सरसाइजच्या माध्यमातून तिचा हा ट्रान्सफॉर्मेशन केला आहे.


मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने साऊथ चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत. आपल्या अभिनयाने तिने साऊथच्या चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे.


श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.

श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fans are annoyed to see the transformation of Shruti Marathe, comments are pouring in on the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.