fandry fame shalu aka rajeshwari kharat shared a dance video viral on social media | ‘फँड्री’च्या शालूनं चाहत्यांना लावलं याडं, पाहा, तिचा इंग्लिश गाण्यावरचा तुफान डान्स

‘फँड्री’च्या शालूनं चाहत्यांना लावलं याडं, पाहा, तिचा इंग्लिश गाण्यावरचा तुफान डान्स

ठळक मुद्देराजेश्वरी तिच्या कुटुंबासोबत सध्या पुण्यात राहते. ख-या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे.

फँड्री हा सिनेमा म्हणजे नागराज मंजुळे यांची अप्रतिम कलाकृती आहे. समाजाचे वास्तव मांडणा-या या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात काम करणारेही अस्सल ग्रामीण बाज असलेले कलाकार होते. सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ अवघडे याने चित्रपटात जब्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. तर अभिनेत्री म्हणून नागराज यांनी राजेश्वरी खरात हिची निवड केली होती. तिने साकारलेली शालूची भूमिकाही प्रचंड गाजली होती़. तिच्या चेह-यावरचे हावभाव, तिचा सहजसुंदर अभिनय चाहत्यांना भावला होता. आता या शालूने धम्माल केलीये. होय, तिचा एक डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

यात शालू अर्थात राजेश्वरी एका इंग्रजी गाण्यावर थिरकताना दिसतेय. अनेक दिवसांपासून रोज वेगवेगळे डान्स व्हिडीओ शेअर करण्याचा धडाका तिने लावलाय. मध्यंतरी तिने तारीफ सून के जो तुम ऐसे शर्मा जाती हो,अच्छी लगती हो या गाण्यावर डान्स केला होता. यानंतर ‘जलेबी’ या गाण्यावर थिरकताना दिसली होती.

शालू साकारणारी राजेश्वरी खरात हिला नागराज यांनी पहिल्यांदा पुण्यात पाहिले होते. फॅन्ड्रीसाठी तिचा एकच चेहरा नागराज यांच्या डोळ्यांपुढे येत होता. पण तिचा शोध लागेना. अनेक प्रयत्नानंतर तिचा शोध लागला. पण पोरीला चित्रपटात काम करू देण्यास तिचे आईवडील तयार होईनात.  नागराज यांनी बरीच समजूत काढल्यानंतर राजेश्वरीच्या आईवडिलांनी परवानगी दिली आणि राजेश्वरी कॅमे-यापुढे उभी झाली.


 
फॅन्ड्रीनंतर राजेश्वरीचा ‘अ‍ॅटमगिरी’  हा सिनेमा आला होता. 
राजेश्वरी तिच्या कुटुंबासोबत सध्या पुण्यात राहते. ख-या आयुष्यात राजेश्वरी प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय आहे. अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तिने अफलातून यश मिळवले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: fandry fame shalu aka rajeshwari kharat shared a dance video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.