हेमंत ढोमेची पत्नी कोण आहे माहितीय? हिंदीमध्ये आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:00 AM2021-10-21T09:00:00+5:302021-10-21T09:00:00+5:30

'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून' मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही तिच्या भूमिकांनी तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे.

This Famous Tv actress is wife of Marathi Actor Hemant Dome, Do you know | हेमंत ढोमेची पत्नी कोण आहे माहितीय? हिंदीमध्ये आहे प्रसिद्ध अभिनेत्री

हेमंत ढोमेची पत्नी कोण आहे माहितीय? हिंदीमध्ये आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Next

छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा किंवा रंगभूमी... कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.अशीच कलाकाराची एक जोडी म्हणजे  अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग. 


मराठीतील एक क्युट कपल म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं.2012 साली दोघांनीही लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. क्षिती जोग मराठी प्रमाणे हिंदी मालिका विश्वातही तितकीच प्रसिद्ध आहे. क्षिती ही प्रसिद्ध जेष्ट अभिनेते अनंत जोग आणि ज्येष्ट अभिनेत्री उज्वला जोग यांची मुलगी आहे. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्षितीनेही अभिनय क्षेत्रात एंट्री करत स्वतःला सिद्ध केले आहे.

क्षिती जोग 'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून' मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही तिच्या भूमिकांनी तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. 'घर की लक्ष्मी बेटिया','साराभाई vs साराभाई', 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही क्षिती झळकली होती.तर हेमंत ढोमेसुद्धा मराठी इंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा सिनेमाच येत्या १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात क्षितीचीही भूमिका आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोघांनीही एकत्र काम केले आहे. क्षिती या सिनेमाची निर्मातीदेखील आहे. 


हेमंत आणि क्षिती दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघेही एकमेकांसाह फोटो शेअर करत कपल गोल देत असतात. त्यांच्या चाहत्यांनाही या कपलचे फोटो प्रचंड पसंतीस पात्र ठरतात.दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.दोघेही एकमेकांची काळजी घेतात. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून मेड फॉर इच अदर  कपल असल्याचे त्यांचे फोटो पाहून तुम्हालाही जाणवेल.

Web Title: This Famous Tv actress is wife of Marathi Actor Hemant Dome, Do you know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app