गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीतील दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार कन्फर्म ते दोघे लग्न करत आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली असून कलाकार मित्र मंडळी देखील लग्नासाठी निघाले आहेत.

सुव्रत जोशीसखी गोखले हे दोघे लग्न करत असल्याचे कन्फर्म जरी असले तरी अद्याप त्यांच्याकडून अधिकृत सांगण्यात आलेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सखीने सोशल मीडियावर बॅचलर रिबनसोबत स्पिनस्टर्स पार्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सुव्रतने केळवणचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यानंतर आज सुव्रतने इंस्टा स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. त्याच्या मित्रमंडळींनी टॅग केलेले हे फोटो आहेत. ज्यात सुव्रतच्या फोटोला नवरा व सखीच्या फोटोला नवरी असे टॅग केले आहे आणि हा फोटो मेहंदी सेरेमनीमधला आहे.

तसेच दुसऱ्या फोटोत एका हातावर सखी असे नाव लिहिलेले दिसते आहे.

 

तर अभिनेत्री पर्ण पेठेने इंस्टा स्टोरीत एका गाडीतील फोटो शेअर केला आहे आणि वरपक्ष असे लिहिले आहे आणि दुसऱ्या स्टोरीत सुव्रत दिसतो आहे. या सर्व फोटो पाहिल्यावर ते दोघे नक्कीच येत्या दोन दिवसात लग्नबेडीत अडकणार हे नक्की दिसतेय.


सुव्रत आणि सखी गोखले यांनी दुनियादारी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्या दोघांचे सोशल मीडियावरील एकत्र फोटो किंवा कोणताही इव्हेंट किंवा कॉफी वा सिनेमाला एकत्र जाण्याचे फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी याबाबत स्वतः कधीच खुलासा केला नाही.

काही दिवसांपूर्वी सखीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत तिची स्पिनस्टर्स पार्टी असल्याचे समजते आहे. त्यात तिने वेस्टर्न आऊटफिटवर बॅचरल लिहिलेले रिबेन तिने परिधान केले आहे. या तिच्या फोटोवर शुभेच्छा व लाइक्सचा वर्षाव होत आहे.

त्यात आता सुव्रतनेदेखील इंस्टाग्राम स्टोरीतून त्याच्या लग्नाबाबत हिंट दिली आहे. आता हा फोटो काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... या फोटोत सुव्रत दिसत नाही पण पंच पक्वानं पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबत त्याने फोटोवर कॅप्शन दिले आहे 'केळवण २'.


परंतु याबाबत स्वतः सखी गोखले व सुव्रत जोशी याबाबत कधी सांगतात, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Exclusive: Marathi Cine Industry this couple will be marry soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.