निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय’ चित्रपटगृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:15 AM2019-01-19T07:15:00+5:302019-01-19T07:15:00+5:30

प्रत्येक क्षण आपल्याला निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाने आपले पूर्ण आयुष्य बदलते किंवा एखादा निर्णय हा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो

Ek nirnay swatacha swatasathi marathi movie release | निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय’ चित्रपटगृहात

निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय’ चित्रपटगृहात

googlenewsNext
ठळक मुद्देकौटुंबिक मूल्यांची जडणघडण आजच्या काळाचं प्रतिबिंब ‘एक निर्णय’ या चित्रपटामधून दाखवण्यात आलं आहे.

प्रत्येक क्षण आपल्याला निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाने आपले पूर्ण आयुष्य बदलते किंवा एखादा निर्णय हा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो. याच निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. स्वरंग प्रोडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन, आणि दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारी अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली आहे.

प्रेम, नातेसंबंध या सर्व वैयक्तिक गोष्टी असल्या तरी या संदर्भातल्या भावना, निर्णय हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. हे निर्णय काळानुसार बदलूही शकतात. कधी सामाजिक परिस्थितीच्या दबावामुळे, तर कधी स्वतःच्या विचार व मतांमुळे. पण आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर स्वत:चा असा एक निर्णय प्रत्येकाला घ्यावाच लागतो. हे  सांगताना कौटुंबिक मूल्यांची जडणघडण आजच्या काळाचं प्रतिबिंब ‘एक निर्णय’ या चित्रपटामधून दाखवण्यात आलं आहे. आजच्या पिढीला काय हवंय, त्याचे विचार, त्याचा जीवनाविषयी दृष्टिकोन कसा आहे. ते आपल्या आयुष्याकडे, कुटुंबाकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतात हे वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यामातून व त्यांनी घेतलेल्या निर्णयातून दाखवण्याचा प्रयत्न ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख,  मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या दिग्गज मंडळी सोबत कुंजिका काळविंट हा नवा चेहरा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती स्वरात बांधली आहेत. रोहन श्रीरंग देशमुख याने सुद्धा चित्रपटातील एक गाणं संगीतबद्ध केले आहे. छायांकन अर्चना बोऱ्हाडें यांचे असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांचे असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. निहिरा जोशी देशपांडे, ऋषिकेश कामेरकर, जयदीप वैद्य, श्रुती आठवले, अंजली मराठे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.

Web Title: Ek nirnay swatacha swatasathi marathi movie release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.