बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांचे फोटो व्हायरल होताना दिसतात. तसाच मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील मास्क आणि वेगळ्या लूकमुळे त्याला ओळखणे कठीण झाले आहे. हा अभिनेता म्हणजे अभिनेता सुबोध भावे. 


सुबोध भावेने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो ब्राह्मणाच्या वेशात दिसतो आहे आणि चेहऱ्यावर मास्कही घातला आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, मास्क आणि वर्क मोड ऑन. 


सुबोध भावेचा हा फोटो गिरिजा ओक गोडबोलेने क्लिक केला आहे. सुबोध भावेचा हा लूक कोणत्या प्रोजेक्टमधील आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. 
दरम्यान अभिनेता सुबोध भावेने ट्विटरला अलविदा करत स्वत:चे अकाऊंट डिलीट केले आहे. स्वत: सुबोधने खुद्द ही माहिती दिली. ‘आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाऊंट डिलीट करतो आहे. काळजी घ्या, मस्त रहा़. जय महाराष्ट्र, जयहिंद’, अशी पोस्ट सुबोधने केली आहे.


सुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती करत आहे. अलीकडे त्याने या मालिकेची घोषणा केली होती. आतापर्यंत आपण सूडाच्या अनेक मालिका पाहिल्या आहेत.

आता शुभमंगल ऑनलाइन च्या माध्यमातून एक हलकीफुलकी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावेने या मालिकेचे वर्णन केले होते. सुबोधची ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सायली संजीव आणि सुयश टिळक अशी नवीन जोडी मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Due to the face mask and different look, it became difficult to recognize this Marathi actor, the photo is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.