'धडाकेबाज'मधील बाप्पा बजरंगी आठवतो आहे ना..!, अभिनेत्याची पत्नी आहे या क्षेत्रात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:00 AM2021-10-19T07:00:00+5:302021-10-19T07:00:00+5:30

मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटात या अभिनेत्याने आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.

Do you remember Bappa Bajrangi in 'Dhadakebaaj' ..!, The wife of this actor working in this field | 'धडाकेबाज'मधील बाप्पा बजरंगी आठवतो आहे ना..!, अभिनेत्याची पत्नी आहे या क्षेत्रात कार्यरत

'धडाकेबाज'मधील बाप्पा बजरंगी आठवतो आहे ना..!, अभिनेत्याची पत्नी आहे या क्षेत्रात कार्यरत

Next

महेश कोठारे दिग्दर्शित आणि अभिनीत धुमधडाका चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटातील बाप्पा बजरंगी तुम्हाला आठवत असेल ना. नुसत्या भारदस्त आवाजाने धडकी भरवून मराठीतील अजरामर चित्रपटात या अभिनेत्याने खरा रंग भरला. धुमधडाका, थरथराट, झपाटलेला यासारख्या मराठीतील दमदार चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे दीपक शिर्के. मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. खुदा गवाह, हम, वंश, जित, शपथ यासारख्या दमदार हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दीपक शिर्के यांची दूरदर्शन वरील एक शून्य शून्यमधील त्यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या तितकीच स्मरणात राहिली आहे. टूरटुर, माझे काय चुकले या नाटकांसोबत सोनी वाहिनीवरील सीआयडी या मालिकेतदेखील ते झळकले आहेत. अत्यंत गरीबीतून मेहनतीची कामे करून त्यांनी आपले बालपण घालवले पण शिक्षणाचा ध्यास कधी सोडला नाही. पुढे चित्रपटांत छोटी मोठी कामे करून आज यश संपादन केले आहे. जवळपास १०० हून अधिक चित्रपट आणि २५ हून अधिक मालिकेत त्यांनी काम केले आहेत. महेश कोठारे आणि दीपक शिर्के यांची खास मैत्री होती त्यामुळेच महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात कधी मित्र तर कधी व्हिलन म्हणून ते आपल्याला नेहमी पाहायला मिळाले. महेश लक्ष्या आणि दीपक यांचे जिवाहून प्यारा तुच माझा यारा ही दोस्ती तुटायची नाय हे गाणे आजही सुपरहिट आहे. महेश कोठारे यांच्या झपाटलेला २ मध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती. महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकरण्याचे त्याची मैत्री हेच कारण आहे.


पांडू या नव्या वेबसीरीजमधून ते पुन्हा छोट्या पडद्यावर झळकताना पाहायला मिळाले. अनेकांना दीपक शिर्के यांच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता आहे पण प्रसिद्ध  अभिनेता असूनही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे कोणाला माहित नाही. दीपक शिर्के यांच्या पत्नीचे नाव गार्गी शिर्के असे आहे. गार्गी या दापोली येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. दीपक शिर्के आणि गार्गी हे दोघे २७ जुलै २००० साली विवाह बंधनात अडकले. दीपक शिर्के आणि गार्गी यांना एक मुलगी देखील आहे. 
 

Web Title: Do you remember Bappa Bajrangi in 'Dhadakebaaj' ..!, The wife of this actor working in this field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app