'झपाटलेला' चित्रपटातील लक्ष्याची आवडी आता दिसते अशी!, आता दिसते खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:00 AM2021-09-24T07:00:00+5:302021-09-24T07:00:00+5:30

१९९३ साली रिलीज झालेला चित्रपट 'झपाटलेला'मधील आवडी आठवतेय ना.

Do you rember Lakshya's Aavdi of 'Zhapatlela', now looks very glamorous | 'झपाटलेला' चित्रपटातील लक्ष्याची आवडी आता दिसते अशी!, आता दिसते खूप ग्लॅमरस

'झपाटलेला' चित्रपटातील लक्ष्याची आवडी आता दिसते अशी!, आता दिसते खूप ग्लॅमरस

Next

१९९३ साली 'झपाटलेला' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, पूजा पवार या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 

'झपाटलेला' चित्रपटात पूजा पवार या अभिनेत्रीने लक्ष्मीकांत बेर्डेची प्रेयसी बनत अक्षरशः धुमाकुळ घातला होता. या चित्रपटातील तिची भूमिका लक्षवेधी ठरली. आजही चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत.

विशेष बाब म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि पूजा पवार ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी मानली जाते. झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा, उतावळा नवरा यासारख्या चित्रपटात पूजा पवारला लक्ष्मीकांत बेर्डे यांची कधी पत्नी तर कधी प्रेयसीच्या भूमिकेत पाहिले आहे.


पूजा पवारचे फोटो पाहून तुम्हाला झपाटलेला चित्रपटातील तिचा ऑनस्क्रीन लूक आठवत असेल ना. या चित्रपटात अगदी देसी अंदाजात दिसलेली पूजा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन ती सुंदर दिसते. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


तसेच पूजाची मुलगी आलिशा साळुंखेनेही अभिनयात पदार्पण केले आहे. अनेक जाहिरातींमध्ये आलिशा सध्या झळकत आहे. आलिशाला पाहताच तिच्यात पूजाची झलक पाहायला मिळते.

तसेच आलिशाला चित्रपटातून नाहीतर नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात करायची आहे. तिने मॉडेलिंग हे केले आहे. त्यामुळे इतर स्टारकिड प्रमाणे आलिशाही इंडस्ट्रीत तिचे स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेते आहे.

Web Title: Do you rember Lakshya's Aavdi of 'Zhapatlela', now looks very glamorous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app