अमित ठाकरे यांच्यासोबत दिसणाऱ्या या तरूणाला ओळखलंत का?,सिनेइंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 06:13 PM2021-07-10T18:13:08+5:302021-07-10T18:13:35+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यासोबत फोटोत असलेला हा तरूण कोण आहे, हे जाणून घ्या

Do you know this young man who appeared with Amit Thackeray? He is the son of a famous actor from Cineindustry. | अमित ठाकरे यांच्यासोबत दिसणाऱ्या या तरूणाला ओळखलंत का?,सिनेइंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे मुलगा

अमित ठाकरे यांच्यासोबत दिसणाऱ्या या तरूणाला ओळखलंत का?,सिनेइंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्याचा आहे मुलगा

Next

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे देखील राजकारणात सक्रिय असून आपल्या वडिलांना नेहमी साथ देताना पाहायला मिळतात. युवा पिढीचे नेतृत्व अमित ठाकरे करताना दिसतात. अमित ठाकरे यांच्यासोबत असलेल्या या तरूणाला ओळखलंत का? हा तरुण कोणत्या राजकीय नेत्याचा मुलगा नसून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. 

अमित ठाकरे यांच्यासोबत फोटोत असलेला हा तरुण आहे अभिषेक गुणाजी. अभिषेक गुणाजी हा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा आहे. अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटासोबतच मालिकांमधून आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविली आहे.

मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच ट्रॅव्हल शोचे सूत्रसंचालन त्याचप्रमाणे महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळाचे ब्रँड अँबेसिडर म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुत्रसंचालिका राणी गुणाजी या मिलिंद गुणाजीच्या पत्नी. हम बने तुम बने मालिकेतून राणी गुणाजी यांनी अभिनय साकारला आहे. कल्पांतर या मराठी मालिकेत एकत्रित काम करत असताना मिलिंद आणि राणी गुणाजी यांची भेट झाली होती. या भेटीचे पुढे प्रेमात आणि नंतर लग्नात रूपांतर झाले. मिलिंद गुणाजी त्यावेळी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होते . कल्पांतर ही त्यांनी अभिनित केलेली पहिलीच मालिका तर राणी गुणाजी रंगभूमीवर सक्रीय होत्या. अभिषेक हा त्यांचा एकुलता एक मुलगा.


अभिषेक गुणाजी आणि अमित ठाकरे हे दोघेही खास मित्र आहेत. या दोघांची मैत्री त्यांच्या एकत्रित फोटोंवरून लक्षात येते. अभिषेकने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. फोटोग्राफीची आवड असलेल्या अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

गेल्या वर्षी त्याने छल या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले होते ज्यात सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी  हे मुख्य भूमिकेत होते. याशिवाय ‘आपलं कर्जत जामखेड’ या ट्रॅव्हल सीरिजचे दिग्दर्शनही त्याने केले होते. 

Web Title: Do you know this young man who appeared with Amit Thackeray? He is the son of a famous actor from Cineindustry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app