director digpal lanjekars health is stable says doctor as he was earlier admitted in hospital | ‘त्या’ सगळ्या अफवा! म्हणून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरला रूग्णालयात भरती केले

‘त्या’ सगळ्या अफवा! म्हणून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरला रूग्णालयात भरती केले

ठळक मुद्देकाल दिग्पालला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

फर्जंद,  फत्तेशिकस्त  यांसारखे चित्रपट देणारा तरुण दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर याला हार्ट अटॅक आल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. पण आता या अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. होय, दिग्पालला अति ताणामुळे त्रास झाला आणि त्याला पुण्यात रूग्णालयात भरती करण्यात आले. तथापि त्याची प्रकृती स्थिर आहे.
दिग्पाल सध्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यग्र आहे. याचदरम्यान त्याना अति ताणामुळे अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले. सध्या काळजीचे काहीही कारण नसून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सौमित्र पोटे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. शिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे.

काल दिग्पालला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. शिवाय अफवांना उधाण आले होते. त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्याला कोरोना झाला, अशा काय काय अफवा पसरल्या होत्या. मात्र आता या बातम्यांमध्ये तथ्य नसून केवळ अति ताण आल्यामुळे हा त्रास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दिग्पाल आणि सहकारी सुश्रुत मंकणी पुण्याहुन मुंबईला चालले होते. वाटेत अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले.  दिग्पाल काही वेळ बेशुद्धही झाला यानंतर त्याला  तात्काळ  पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले. 
दिग्पालच्या  फर्जंद, फत्तेशिकस्त  आदी चित्रपटांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अभिनयाच्या बाबतीतही तो आपली वेगळी छाप पाडतो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: director digpal lanjekars health is stable says doctor as he was earlier admitted in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.